Chinchwad : रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडच्या अध्यक्षपदी मयूर कलशेट्टी

एमपीसी न्यूज – रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडच्या अध्यक्षपदी मयूर कलशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदाची सूत्रे सिद्धांत अगरवाल यांच्याकडे सोपविण्यात आली. चिंचवड मधील रोटरी कम्युनिटी सेंटर येथे पदग्रहण समारंभ पार पडला.

पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रांतपाल रो. जितेंद्र शर्मा, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, माजी अध्यक्षा अनघा रत्नपारखी आदी उपस्थित होते. पदग्रहण समारंभात सन 2018-19 या वर्षीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्ष पदावर उमर इनामदार तर सदस्य म्हणून तेजस समर्थ, सेहज जग्गी, गुंजन, स्वप्नील कोल्हे, तुषार समर्थ, सई सोहनी, विकास काकरपार्थी, यशराज खंडागळे, गोपाल सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

मयूर कलशेट्टी म्हणाले, “रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने पुढील वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने मुलांच्या राष्ट्रीय पोहण्याच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड त्या स्पर्धेसाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या बरोबरीने काम करणार आहे. या उपक्रमापासून यावर्षीच्या सामाजिक कामांची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ चिंचवड सोबत क्रीडा, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास यांसारख्या विविध विषयांवर काम करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.