Pune : राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे यांना आंदोलकांनी भाषण करण्यापासून रोखले

मराठा आरक्षण : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयावर आंदोलकांचा ठिय्या

एमपीसी न्यूज- राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत.

आज मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुण्यातील कार्यालयासमोर ठिय्या देत घंटानाद आंदोलन केले. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे हे निवेदन स्वीकारण्यास उपस्थित होते, मात्र जालिंदर कामटे यांनी निवेदन स्वीकारताना भाषण सुरू करताच आंदोलकांनी गोंधळ घालत कामटे यांना भाषण करण्यापासून रोखले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी निवेदन स्वीकारायला उपस्थित राहिला हवं होतं अशी मागणी यावेळी आंदोलकांनी करत खासदार सुप्रिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सुप्रिया सुळे जागे व्हा, म्हणत आंदोलकांनी घंटानाद करत घोषणाबाजी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.