पाखी चित्रपटानंतर अभिनेता सुमित कांत कौलला लागले मराठी चित्रपट सृष्टीचे वेध!

71

(दीनानाथ घारपुरे)

HB_POST_INPOST_R_A

एमपीसी न्यूज- देव आनंद, प्राण यांसारख्या दिग्गज कलावंतांच्या चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी कारणीभूत असणारे नामवंत निर्माते दिग्दर्शक यशवंत पेठकर यांचा नातू सुमित कांत कौल याचे लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण होणार आहे. आजोबांकडून मिळालेला वारसा व अभिनयाचे धडे गिरवत येत्या 10 ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या ‘पाखी’ या चित्रपटातून सुमित आपल्यासमोर येणार आहे. गेली पाच वर्षे नाटक, शॉर्ट फिल्म आणि वेब सिरीजमधून प्रियकर असो वा वृद्ध प्रत्येक भूमिका चोख पार पाडत, सुमित आता खलनायकाच्या नवीन भूमिकेत रुपेरी पडद्यावर आपणांस दिसून येणार आहे.

सुमित कांत कौल याची घेतलेली खास मुलाखत :

10 ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या तुझ्या पहिल्यावहिल्या ‘पाखी’ या चित्रापटाबद्दल काय सांगशील?

सुमित – ” ‘पाखी’ हा लहान मुलांची तस्करी व बालविवाह या विषयांवर भाष्य करणारा सिनेमा आहे. आपल्या देशात दर आठ मिनिटांनी एखाद्या मुलाचे अपहरण होते तर, प्रत्येक एका तासात,एखाद्या बाळाचा अनैतिक व्यापार केला जातो. उद्या त्यापैकी एक मुलं हे आपलं देखील असू शकतं या विचाराने माझं मन विचलित होतं त्यामुळे ह्याबद्दल चित्रपपटाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे.”

‘पाखी’ चित्रपटातील ‘बाली’ या तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?

सुमित – “बाली नामक खलनायकाची भूमिका मी साकारतो आहे.ही भूमिका 100 रावणांच्या समतुल्य असल्यामुळे ती साकारणं माझ्यासाठी खुपचं आव्हानात्मक होतं. वास्तविक आयुष्यात मी खूप मेडिटेशन करीत असल्यामुळे माझा मुळ स्वभाव हा फार शांत आहे. अशावेळी बाली साकारण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले. क्रोध, अहंकार यांसारखे राग आत्मसात करावे लागले. बाली ही भूमिका जरी निगेटीव्ह असली तरीही ती साकारायला मिळणं हे खूप पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी.”

तुझे आजोबा सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक यशवंत पेठकर यांकडून तुला मिळालेल्या शिकवणुकीचा तुला अभिनय करताना कसा उपयोग झाला?

सुमित – आजोबांचं (यशवंत पेठकर) माझ्या कारकिर्दीत खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट पाहत मी मोठा झालोय. त्यामुळे अभिनय, चित्रपट हे माझ्या फार जवळीकतेचे विषय आहेत. लहानपणापासून मी आजोबांना मधुबाला, गीताबाली, लता मंगेशकर, आशा भोसेले यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करताना पाहिलं आहे. त्यांच्याबरोबर काम करतानाचा आजोबांचा शांत आणि सोज्वळ स्वभाव माझ्या मनात आजवर घर करून आहे. आणि ह्या पुढे देखील मी माझ्या कारकिर्दीत त्यांच्याकडून मला मिळालेला हा गुण असाच राखून ठेवेन.”

तुला मराठी चित्रपटात काम करायची खूप ईच्छा आहे. असं ऐकिवात आहे. त्याबद्दल तुझं काय मत आहे?

सुमित –  हो मराठी भाषेची गोडी मला आजोबांनी लावली. लहानपणी पुण्याला आजी-आजोबांकडे यायचो तेव्हा मला मराठी शिकायला मिळायचं आणि मला देखील ते शिकायला खूप आवडायचं. मी आजही मी वेगवेगळ्या मराठी वाहिन्यावरील अनेक मालिका नियमित बघतो त्यामधून सुद्धा मला बरच काही शिकायला मिळते त्यामुळे मला फायदाच होतो.. त्यातील नाती, प्रेम, माया हे सर्व खूप आपलंसं वाटतं मला. सैराट सिनेमा मला फारच आवडला त्यातील सरळ व साधेपणा मनाला भिडला आणि तेव्हापासून आपण देखील मराठीत असा एखादा चित्रपट अभिनित करावा अशी खूप ईच्छा आहे माझी. एखादी चांगली मराठी स्क्रिप्ट आली तर मला तो चित्रपट करायला नक्कीच आवडेल.

शेवटी सुमितला त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मुलाखत संपवली…

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: