Pimpri: ‘वायसीएमएच्‌’मध्ये मानधनावर डॉक्‍टरांची भरती

205

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच् रुग्णालयात 22 वरिष्ठ आणि 47 कनिष्ठ डॉक्‍टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मानधनावर हंगामी कालावधी करिता करण्यात आली आहे.

वायसीएमएच् रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असते. पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना हे रुग्णालय वरदान ठरत आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण वायसीएमएच्‌मध्ये येतात. तथापि, रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. सध्या 19 वरिष्ठ आणि 54 कनिष्ठ डॉक्‍टर्स वायसीएममध्ये कार्यरत आहेत. ही संख्या देखील अपुरी आहे.

त्यामुळे वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना पुरविल्या जाणा-या वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होत आहे. वायसीएममधील मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत वारंवार आवाज उठविला जातो. त्या पार्श्वभूमीवर हंगामी कालावधीकरता डॉक्‍टरांची भरती करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2
%d bloggers like this: