Pune : मुद्रण कॉलेजचे रूपांतर विश्वविद्यालयात व्हावे- पंडित वसंतराव गाडगीळ

एमपीसी न्यूज – आधुनिक काळाची गरज असल्याने संस्थेने भारतातील पहिले मुद्रण महाविद्यालय स्थापन केले. मात्र आता त्याचे रूपांतर मुद्रण विश्वविद्यालयाकडे नेऊन वाटचाल करावी अशी अपेक्षा पंडित वसंतराव गाडगीळ यांनी व्यक्त केली.

मुद्रण महर्षी डॉ. प. भ.कुलकर्णी प्रतिष्ठान आणि पुणे विद्यार्थी गृहातर्फे मुद्रण कॉलेजचे माजी प्राचार्य ऋषिकुमार उनियाल यांना मुद्रण क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते मुद्रणमहर्षी डॉ प.भ कुलकर्णी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. पुणेरी पगडी, शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी दि पुना प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रवी जोशी, पुणे विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्राध्यापक राजेंद्र कांबळे, कुलसचिव सुनील रेडेकर, विश्वस्त राजेंद्र कडूस्कर उपस्थित होते.

पंडित गाडगीळ म्हणाले की, आधुनिक काळाची गरज असल्याने संस्थेने भारतातील पहिले मुद्रण महाविद्यालय म्हणून न पहाता आता त्याचे रूपांतर मुद्रण विश्वविद्यालया कडे नेऊन वाटचाल करावी म्हणजे कै. डॉ. प. भ. कुलकर्णी आणि आम्हा मुद्रक परिवाराला समाधान मिळेल.

पुरस्कारास उत्तर देताना उनियाल म्हणाले की, प.भ.कुलकर्णी यांच्या शिस्तबद्ध कामकाजामुळे आम्ही घडलो, त्यांचे मार्गदर्शनाखाली कॉलेज उभारणीत तसेच मुलांना शिक्षण देण्यात मदत केली. यामुळेच आजचा सन्मान मिळाला असे वाटते.

यावेळी प्रिंट विक मासिकातील 100 उद्यजकांमध्ये नाव आलेले कॉलेजचे माजी विद्यार्थी बुर्डा, इंडियाचे बी.ए. शेष, विक्रम प्रिंटर्सचे मंदार उगार, अमोल असोसिएट्सचे अमोल देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रिंटिंग डिप्लोमामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रिंटींग डिप्लोमाचे विद्यार्थी प्रांजल दौंडकर, प्रशांत राऊत, गणेश गायकवाड, प्रिंटींग इंजिनिअरिंग कॉलेजची प्रणाली कटारिया, युवराज चव्हाण, शिवम हरणमारे, प्रताप ठोंबरे यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

स्वागत नितीन वाणी यांनी केले. सूत्रसंचालन सुधन्वा रानडे यांनी केले तर आभार प्रा. राजेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश घोडके, सचिन कुलकर्णी, दत्ता मुजुमदार, ममता कुलकर्णी, मधुरा महाजन, प्राचार्य डॉ.नेरकर, प्राचार्य शिंदे आणि रघुनाथ ढोक यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आजी माजी प्राचार्य, कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.