Talegaon Dabhade : मधुकर गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज-  धामणे (ता.मावळ) येथील वारकरी संप्रदाय व शेतकरी कुटुंबातील मधुकर वाघू गराडे (वय 85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते आनंदा गराडे यांचे ते वडील होत.

त्यांच्या मागे पत्नी,विवाहित मुलगी,मुलगा,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते जुन्या पिढीतील मावळ तालुक्यातील नामांकित पहिलवान होते. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. धामणे गावातील स्मशानभूमीला तसेच मंदिर बांधण्यासाठी त्यांनी स्वतःची जागा दिली होती.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.