BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : श्रीकृष्ण मंदिरात स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त निगडीच्या श्रीकृष्ण मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती कृष्ण मंदिरचे विश्वस्त हरिदास नायर यांनी दिली.

यावेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल अभय शास्त्री, ओमप्रकाश पेठे, डॉ दीपक शहा, बी.एल जोशी आदी उपस्थित राहणार आहे. या उपक्रमात शहरातील सर्व लायन्स क्लबचे सभासद सहभागी होणार आहेत. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3