Pune : संविधान जाळल्याच्या निषेधार्थ आरपीआयने केले मनुस्मृतीचे दहन

एमपीसी न्यूज- दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या घटनेचे पडसाद देशभरात पहायला मिळत आहेत, आज या घटनेचा निषेध करत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यासमोर आरपीआयच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.

दिल्लीतील जंतरमंतर येथे काही व्यक्तींनी भारतीय संविधान जाळल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात निषेध केला जात आहे. आज सकाळी पुण्यात रिप्लाब्लिक ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलयासमोर मनुस्मृतीचे दहन करत आरोपींचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली. यावेळी मनुवाद मुर्दाबादच्या घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.

उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष परशुराम वाडेकर हे देखील आंदोलनास उपस्थित होते. दरम्यान, या घटनेचा निषेध करण्यासाठी कोणत्याही बंदची घोषणा करण्यात आली नाही तसेच सर्व नागरिकांनी याचा शांततेत निषेध करावा अस आवाहन आंदोलकांकडून करण्यात आलं आहे.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.