Pune : ‘डिजीटल युगातील नोकरी क्रांतीतील कौशल्य ‘ चर्चासत्रास चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) आणि ‘जॉबीझा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल युगातील नोकरी क्रांती आणि कौशल्य : 2025 मधील करियर’ विषयावर चर्चासत्राचे आयोजन आले होते.

‘भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी प्रास्ताविक केले.

या चर्चासत्रात जितेंद्र सोनार (महाव्यवस्थापक, ऑटोलाइन इंडस्ट्रीज लि.), उद्धव जोशी (ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रा. लि., एच आर प्रमुख), नीरज गुप्ता (नॉर ब्रेमेझ टेक्नॉलॉजी सेंटर इंडिया प्रा. लि.) यांनी मार्गदर्शन केले.

चर्चासत्राला विविध उद्योगांचे मानव संसाधन व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्ष, प्राध्यापक , विद्यार्थी सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.