Pune : कॉसमॉस बँकेची सर्व एटीएम दोन-तीन दिवसांसाठी बंद ; – अध्यक्ष मिलिंद काळे (व्हिडिओ )

खातेदार बँकेत जाऊन पैसे काढू शकतात

एमपीसी न्यूज- कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील अनेक खात्यांच्या डेबिट कार्डाची माहिती चोरून मधून अज्ञात व्यक्तीने बँकेच्या तब्बल 94 कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. मात्र ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून घाबरून जाण्याचे कारण नाही असा दिलासा बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी दिला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकारामध्ये बँकेच्या ठेवीदारांचा पैसे सुरक्षित असून ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कॉसमॉस बँकेची सर्व एटीएम दोन-तीन दिवसांसाठी बंद असतील. खातेदार बँकेत जाऊन पैसे काढू शकतात असे काळे यांनी स्पष्ट केले.

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील मुख्यालयात 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते रात्री 10 च्या दरम्यान आणि 13 ऑगस्ट रोजी घडला. या घटनेमुळे बँकिंग विश्वात खळबळ उडाली आहे. गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हरवर अज्ञात मालवेअरचा हल्ला करून अनेक अनेक खातेधारकांच्या डेबिट कार्ड, रुपी कार्डाची ची माहिती चोरून त्याद्वारे 94 कोटी रुपये हॉंगकॉंगच्या हान्सेन्ग बँकेत ट्रान्सफर करून रक्कम काढल्याचे उघडकीस आले आहे.

   

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.