Chakan News : खेड मध्ये नवे 65 कोरोना रुग्ण ; 108 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात बुधवारी (दि.15 सप्टेंबर ) 17 गावे आणि 3 पालिकांमध्ये 65 रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 970 झाला आहे. यापैकी 34 हजार 98 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  

दिवसभरात 108 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत 295 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा 577 एवढा झाला आहे. सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 41 रुग्ण, चाकण 7, आळंदी 2, राजगुरुनगर 15 असे एकुण 65 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.

खेड तालुक्यात बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
चऱ्होली खु. , चास , गोलेगाव, जरेवाडी, कुरुळी, मेदनकरवाडी, पिंपळगाव, रेटवडी, सातकरस्थळ या गावांमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण , चांडोली , दावडी , होलेवाडी ,  कोरेगाव बु. या गावांमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण , अरुडेवाडी मध्ये 3 रुग्ण , कोयाळी मध्ये 4 रुग्ण , चिंचोशी व कडूस मध्ये प्रत्येकी  8 रुग्ण  असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.