Karla: गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

एमपीसी न्यूज – कार्ला येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार आणि मुख्याध्यापक सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्ला येथे गुरुवारी (दि.16) झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूमविचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, अल्पसंख्याक शिक्षण अधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर, नूमविचे सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेश शहा, गोपाळे सर, माजी उपसभापती शरदराव हुलावळे, कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी हुलावळे, उपसरपंच चंद्रकांत गायकवाड, प्रदिप हुलावळे,अविनाश हुलावळे, ग्रामपंचायत सदस्या रुपाली हुलावळे, लता चव्हाण, सरपंच गणपत भानुसघरे, सरपंच किरण येवले, सागर हुलावळे, भाऊसाहेब हुलावळे, दुर्गा परमेश्वरी मंदिराचे अजय शिराली उपस्थित होते.

कार्ला येथील एकवीरा विद्या मंदिर येथील प्रेम बोरकर, दिया येवले, तेजल केदार या विद्यार्थींनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये यश संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे. त्यामूळे त्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक इंगुलकर सर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कार्ला शाळेतील मुख्याध्यापक गुंडाप्पा साखरे यांचा सेवानिवृत्तिनिमित्त सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.