Somatane Phata : तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंचे यश

एमपीसी न्यूज- जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले.

ही स्पर्धा गुरुवारी (दि. 16) सोमाटणेफाटा येथील गुरुकुल कुस्ती संकुलामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बाळासाहेब शेळके एज्युकेशन सोसायटी तर्फे इंद्रायणी इंग्लिश स्कूलच्या पै सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुलाच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले. सारंग संतोष राक्षे व श्रीचंद्र संदीप भेलके यांनी चमकदार कामगिरी करून विशेष प्राविण्य मिळवले. तर शाळेची विद्यार्थीनी प्रियदर्शनी हिंमाशु दास हिने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला.

या विद्यार्थ्यांना क्रिडाशिक्षक विशाल मोरे व मित्तल सील यांचे मार्गदर्शन लाभले. इंद्रायणी इंग्लिश स्कूल व इंद्रायणी उद्योग समुहाचे संचालक संतोष बाळासाहेब शेळके यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like