Chinchwad : स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे धनुर्विद्या स्पर्धेत 150 शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज- स्टार आर्चर्स अकॅडमीतर्फे दुसऱ्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत 50 हुन अधिक शाळेमधून 150 शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा चिंचवड येथील ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल येथे घेण्यात आली.

इयत्ता 1 ते 12 च्या विविध वयोगटातील खेळाडूंसाठी या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर , शाळेच्या प्राचार्या अमृता वोरा आणि रेशमा शेख तसेच पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री, स्टार आर्चर्स अकॅडमीच्या संचालिका व आंतरराष्टीय पदक विजेत्या सोनल बुंदेले उपस्थित होते.

अशा प्रकारच्या स्पर्धामधून जास्तीत जास्त खेळाडूंना सहभाग मिळून राष्टीय व आंतरराष्टीय खेळाडू निर्माण करता येतील तसेच पिंपरी-चिंचवड शहरात धनुर्विद्या खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात मदत होईल, असे मत सोनल बुंदेले यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.