Chinchwad : शिवाजीराजे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतले खगोलशास्त्राचे धडे

एमपीसी न्यूज – स्पेस अवकाश विज्ञान, उपग्रह, चंद्रयान आणि मंगळयान आदींची माहिती घेत विद्यार्थ्यांनी, उपग्रह म्हणजे काय, त्याची निर्मिती, प्रक्षेपण याबाबत अधिक जाणून घेतले. त्यामुळे श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात तारे जमी पर अवतरले होते.

निमित्त होते, अवकाश विज्ञान जागृती कार्यक्रमाचे. जगविख्यात शास्त्रज्ञ, संशोधक स्वर्गीय डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मदिनानिमित्त इस्त्रो अहमदाबाद, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट पुणे, पिंपरी- चिंचवड सायन्स पार्क, स्पेस शिक्षण व खगोल शिक्षण फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्त्रो सेलचे अध्यक्ष डॉ. एम. उत्तम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत जोशी, डॉ. सी. नागरणी, अमित बच्छाव, इस्त्रोचे डॉ. अरुणकुमार सिन्हा, अण्णा जाधव, संचालक विजय जाधव आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी इयत्ता 8 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी स्पेस अवकाश विज्ञान, उपग्रह, चंद्रयान आणि मंगळयान यावर आधारित विज्ञान प्रदर्शनाची माहिती घेतली. दुस-या सत्रात विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना डॉ. उत्तम जोशी यांनी उत्तरे दिली.

पर्यवेक्षक अनिल करपे यांनी सूत्रसंचालन केले. सायन्स पार्कचे कासार, ट्रस्टचे संतोष पिसे, प्रशांत डोबरियाल, नाना शिवले, मुख्याध्यापक बी. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक किसन अहिरे, भाऊसाहेब पगार आदींनी संयोजन केले. क्रीडाशिक्षक उत्तम भालेराव यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.