Lonavala : धनश्री पाध्ये यांना वाणिज्य विषयाची पीएचडी

एमपीसी न्यूज- डाॅ.बी.एन.पुरंदरे कला श्रीमती एस.एस. जी. जी. वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोणावळा या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका धनश्री शंकर पाध्ये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून वाणिज्य विषयाची पी. एच. डी. प्रदान करण्यात आली.

डॉ. धनश्री पाध्ये यांनी “अ क्रिटीकल स्टडी ऑफ मार्केटिंग स्ट्रेटेजिस ऑफ हेल्थकेअर टुरिझम विथ स्पेशल रेफरन्स टू वेस्टर्न महाराष्ट्र” या मध्ये संशोधन करून पी.एच.डी. पदवी ग्रहण केली. यावेळी धनश्री पाध्ये यांनी संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त, सहकारी, कुटुंबीय, गुरु, शिक्षक यांचे वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. डॉ. धनश्री पाध्ये या सदर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असून त्यांच्या या कार्याबद्दल सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.