Pimpri : उत्तम आरोग्यासाठी सायकल शेअरिंगचा वापर करावा – महापौर राहुल जाधव

एमपीसे न्यूज- पिंपरी-चिंचवड शहर प्रदूषणमुक्त व सर्वांसाठी आरोग्यदायी असावे त्यासाठी नागरिकांनी सायकल शेअरींगचा वापर करून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला. त्यावेळी महापौर राहुल जाधव बोलत होते.

पिंपळे सौदागर येथील कुंजीर क्रीडांगणामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, नगरसेवक नाना काटे, निर्मला कुटे, विठ्ठल काटे, माजी नगरसेवक विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गटूवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, इलू बाइक्स कंपनेच सुनील जालीहाल व रितेश राठोड आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, ” पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होईल”

यावेळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर ते राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरवपर्यंत सायकल शेअरींगमध्ये आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक सचिन चिखले, नगरसदस्य विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आदी मान्यवरांनी सायकल चालवली. प्रायोगिक तत्वार 34 ठिकाणी सायकल शेअरींग उभारण्यात येणार असून किफायतशीर दर व ऑफरचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी या वेळी केले

सायकल शेअरिंगची ठिकाणे-

पिंपळे सौदागर व्दारकादेश सोसायटी, साई आंगण होम्स, कुणाल आयकॉन समोर, कुंजीर गार्डन, ऍल्कोव्ह सोसायटी गेटसमोर, कुंजीर मैदान, फॅब इंडिया, कुणाल आयकॉन रोड, गुरुकुल सोसायटी इन्ट्रीगेट, साई गार्डन, गोविंद यशदा चौक बीआरटीएस, पी.के. चौक बीआरटीएस, निसर्ग निर्मिती सोसायटी बीआरटीएस, रिलायन्स फ्रेश, रहाटणी रोड राधिका शॉप, शिवाजी पुतळा चौक, महादेव मंदिर, क्रीमेटुरीयेम वॉल, आरक्षित नं 361 गार्डन, काटेपुरम चौक बीआरटीएस, पिंपळे गुरव जवळकर चौक बीआरटीएस, कल्पतरु सोसायटी, सेव्ह ट्री चौक, तुळजा मंदिर, डायनॉसॉर गार्डन सीमाभिंत, दापोडी रोड महाराष्ट्र बँक, शिव गणेश चौक, शिरोडे रोड ब्लयू डार्ट ऑफीस, बंटी चौक हरीओम मार्केट जवळ, काटेपूरम चौक कुंदन सुपर मार्केट, काटेपूरम फेज2, काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल, रामकृष्ण चौक दक्षिण बाजू, दापोडी रोड आरक्षण क्र 347, गायत्री मेडीकल स्टोअर दापोडी रोड, निलम सुपर मार्केट

31 ऑगस्ट 2018 अखेर या योजनेचा लाभ सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना घेता येईल एका महिन्यामध्ये इलू 30 अंतर्गत 100 रुपयांमध्ये 30 फे-या घेता येतील व यापुढे दर अर्धा तासाला रक्कम रुपये 5 असतील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रावण हर्डीकर यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर आभार नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.