-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : नगरसेवक हरवले आहेत !; प्रभाग 33 मधील नागरिकांनी लावले फलक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या जगप्रसिद्ध आहेत. अगदी शेलक्या शब्दात समोरच्याचा अपमान करणे हे फक्त पुणेकरच करू शकतात एरवी खास करून पेठ भागात आढळणाऱ्या या पाट्या आता शहराची ओळख बनल्या आहेत. या पाट्यांमधून पार्किंग पासून ते पुणेकरांच्या झोपेच्या वेळेपर्यंत सगळेच येते. मात्र, आता शहरातील प्रभाग 33 मधील नगरसेवकांना आपल्या कामाची आठवण करून देण्यासाठी नागरिकांनी ‘नगरसेवक हरवले आहेत’ असे फलक लावले आहेत.

वडगाव धायरी – सनसिटी या 33 नंबरच्या प्रभागात हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले, राजू लायगुडे हे नगरसेवक आहेत. याच प्रभागातील डीएसके रोड ते डीएसके विश्व ( चव्हाण बाग ) या परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली असून ड्रेनेजचे पाणी सुद्धा रस्त्यावर आले असल्याने या रस्त्यावर अपघात देखील होत आहेत. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी कानाडोळा केल्याने प्रभागातील नागरिकांनी

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

हरवले आहेत ! हरवले आहेत !
प्रभाग 33 मधील
नगरसेवक हरवले आहेत !
रोडवर ड्रेनेज मैला पाणी…
रस्त्याची प्रचंड दुरवस्था…
अपघातांची मालिका सुरु…
अशा आशयाचे बॅनर लावून नगरसेवकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, अशाप्रकारे रस्त्यावर जाणून बुजून मैला पाणी रस्त्यावर सोडण्यात येत असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक राजू लायगुडे यांनी केला असून सबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे देखील लायगुडे यांनी सांगितले आहे. रत्यावर खड्डे पडले असून ते बुजवण्यासाठी मी स्वतः तिथे उपस्थित राहून कामाचा आढावा घेत आहे. पण विरोधकांनी अशा प्रकारचे कितीही बॅनर लावले तरी मला फरक पडत नसून मी माझे काम करत असल्याचे देखील लायगुडे म्हणाले. पाऊस सुरु असल्यामुळे कामात अडथळा येत आहे मात्र पाऊस उघडल्यास लगेचच काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.