Pune : माओवाद्यांविरुध्द पुणे पोलिसांचे सर्च ऑपरेशन ; देशभरातील पाच ठिकाणी छापे

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन आज पहाटे (दि. 28) हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड या ठिकाणी छापे घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

या सर्च ऑपरेशनमध्ये वरावरा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण परेरा (मुंबई), सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा (छत्तीसगड), आनंद तेलतुंबडे (गोवा) यांच्या घरावर छापे टाकून घराची झडती घेतली.

_MPC_DIR_MPU_II

मिऴालेल्या माहितीनुसार, माओवाद्यांच्या घरी छापे घातले असून त्यांच्या घरातून माओवाद्यांशी संबंधित काही कागदपत्र आणि साहित्य जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिऴाली आहे. याप्रकरणी सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी कारवाई चालू असल्याचे सांगत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

पुण्यातील शनिवारवाड्याच्या मैदानावर 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी माओवाद्यांनी पैसे पुरवल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यासह अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, प्रा.शोमा सेन, रोना विल्सन यांना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या 200 ई-मेलमध्ये माओवादी चळवळीशी या पाच जणांचे घनिष्ट संबंध असल्यावरून त्यांना अटक केली असल्याची माहिती तत्कालीन सहआयुक्त रवींद्र कदम यांनी दिली होती.

याप्रकरणी पोलिसांनी आज छत्तीसगढ, हैद्राबाद, दिल्ली, मुंबई या शहरात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी छापे घालत झडती घेणे सुरु केले. ज्यांच्या घराची आता चौकशी सुरु आहे त्यांचा एल्गार परिषद अथवा कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी संबंध नसून ते बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.