Pimpri : टाटा मोटर्सतर्फे भारतातील भविष्यकालीन शाश्वत वाहतूक पर्याय सादर

बस वर्ल्ड इंडिया 2018 मध्ये संपूर्ण नव्या श्रेणीतील वाहतूक वाहनांचे प्रदर्शन

एमपीसीए न्यूज- टाटा मोटर्सने शाश्वत वाहतूक पर्यायांसाठीची वचनबद्धता प्रत्यक्षात उतरवत टाटा मोटर्स हा भारतातील अग्रेसर बस ब्रँड बस वर्ल्ड इंडिया 2018 मध्ये पाच नवी सार्वजनिक वाहतुकीची वाहने सादर करण्यास सज्ज झाला आहे. बस वर्ल्ड इंडिया 2018 हे जगातील सर्वात मोठे बी2बी बस आणि कोच प्रदर्शन आहे.

नव्या श्रेणीतील वाहतुकीच्या पर्यायांमध्ये – स्टारबस अल्ट्रा एसी 22 सीटर पुश बॅक, स्टारबस 12 सीटर एसी मॅक्सी कॅब, विंगर 12 सीटर, टाटा 1515 एमसीव्ही स्टाफ बस आणि मॅग्ना इंटरसिटी कोच यांचा समावेश असेल. सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुरक्षिततेची वैशिष्ट्ये यांनी सज्ज असलेल्या या नव्या वाहनांमध्ये सर्वोत्तम रचना, सर्वोत्कृष्ट इंधन अर्थयंत्रणा आणि सर्वात जास्त काळ सेवा देणे यांचा समावेश आहे, यामुळे तुमचा प्रवास अधिक आनंददायी आणि सुरक्षित होतो.

या निमित्ताने टाटा मोटर्सच्या प्रवासी व्यावसायिक वाहनांच्या उत्पादनांचे प्रमुख रोहीत श्रीवास्तव म्हणाले, “टाटा मोटर्सच्या बस म्हणजे सर्वोत्कृष्टता आणि नावीन्यपूर्णता यांच्यातील हॉलमार्क आहे, अशा बस भारतीय आणि जागतिक वाहतुकीच्या परिस्थितींसाठी अशा दोन्ही स्तरांवरील परिस्थितीसाठी स्वीकारल्या गेल्या आहेत. आमच्या 2.0 धोरणाअंतर्गत, आम्ही सुधारित वैशिष्ट्ये आणि सर्वोत्तम तांत्रिक बदल यासह नव्या श्रेणीतील उत्पादने सादर करण्यावर अधिक जोरदार लक्ष केंद्रीत केले आहे. सक्षम, स्वच्छ, सुरक्षित, सहज उपलब्ध होणाऱ्या आणि प्रवाशांना परवडतील अशायोग्य दरातील उत्पादने देण्याला आमचे प्राधान्य आहे. बस वर्ल्ड 2018 मध्ये आम्ही आमच्या भारतातील सर्वोत्तम बसप्रकारातील उत्पादने सादर करणार आहोत, या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आलेला आहे’’

टाटा मोटर्सच्या प्रवासी व्यावसायिक वाहनांच्या विक्री आणि वितरण विभागाचे प्रमुख संदीप कुमार म्हणाले, “बसवर्ल्ड इंडिया 2018 सह संलग्नितपणे प्लॅटिनम प्रायोजकत्व स्वीकारताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना सर्वात नवीन श्रेणीतील बस दाखवण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. सुलभता, आरामदायी आणि स्मार्ट प्रवासाचे पर्याय आम्ही येथे सादर करत आहोत. आमची उत्पादने नव्या दमाची उत्पादने आणि वाहतुकीचे पर्याय सादर करत आहेत. आमची ही विशेष उत्पादने प्रवाशांबरोबरच चालकांसाठीही आहेत’’

ठळक वैशिष्ट्ये:

– अंतर्गत अॅप्लिकेशनसाठी परिपूर्ण उपाययोजना म्हणून सादर करण्यात आलेली मॅग्ना ही भारतातील पहिली बस बॉडी कम्प्लेंट (बीबीसी) लक्झरी इंटरसिटीबस आहे. ती दोन प्रकारच्या पॉवर नोड्समध्ये (180 एचपी आणि लवकरच येणाऱ्या 230 एचपी) उपलब्ध आहे. नवीन श्रेणीतील कोच 35-44  श्रेणीतील सीटच्या क्षमतांचे आहेत आणि याची बूट स्पेस 7.5 घनमीटर आहे; ही बस कमिन्स आयएसबीई 5.9 इंजिन, टाटा जी 750 गिअरबॉक्स, व्हीओआयीटीएच रिटार्डर आणि मार्कोपोलो बस बॉडी अशा विश्वासार्ह घटकांनी बनलेली आहे.

मॅग्नाचे बाह्यरूप नजर खिळून राहावी असे आहे आणि बसची अंतर्गत सजावट प्रेक्षकांचा प्रवास सुखकर करणारी आहे. – कर्मचारी आणि पर्यटक प्रकारावर लक्ष केंद्रीत केलेल्या स्टारबस अल्ट्रा एसी 22 सीटर पुश बॅक आणि स्टारबस 12 सीटर एसी मॅक्सी कॅब, या टाटा मार्कोपोलोद्वारे बनवण्यात आल्या आहेत. या बसमध्ये वैयक्तिक चार्जिंग पॉइंट, हाताला विश्रांती देण्यासाठी सर्व सीटवरील जागा, जास्तीत जास्त आरामासह पुश बॅक लक्झरी लेदर सीट, पॉवर स्टिअरिंग, एअर ब्रेक आणि आतील सजावट अधिक खुलवण्यासाठी एलईडी लाइटिंग अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

– स्टारबस अल्ट्रा एसी 22 सीटर पीबी नव्या दमाच्या टर्बोट्रोन इंजिन 140 एचपीसह येते, यामध्ये पहिल्या 7 लाख किमीपर्यंत दुरुस्तीसाठी तपासणीचा समावेश आहे आणि या प्रकारातील ती किमान एनव्हीएचची आहे. तर दुसरीकडे, स्टार बस 12 सीटर एसी मॅक्सी कॅब 450 एसपी सीआर इंजिनसह येते, याच्या प्रक्रिया अतिशय सुलभ आहेत. तसेच जीबी- 550 चा गिअरबॉक्स बदलता येणाऱ्या केबलमध्ये बसवण्यात आला आहे. रॅडिअल ट्यूबलेस टायर, पॅराबोलिक सस्पेन्शन आणि टिल्टेबल स्टिअरिंग यासारख्या इतर वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांना आणि चालकालाही अतिशय आरामदायी प्रवास करता येतो.

– 2.2 लीटर डिकॉर इंजिन आणि फ्लॅट टॉर्क कर्व्ह यासह विंगर12 सीटर बस हे सर्व संकल्पना नव्याने रचणारे एक नाविन्यूपूर्ण उत्पादन आहे. कामगिरी आणि इंधन सक्षमता असलेले हे उत्पादन सहली आणि प्रवास आयोजित करणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे आहे.

– एसटीयूकडून किंवा स्टाफ अॅप्लिकेशनकडून पूर्णपणे बांधणी झालेल्या बसची मागणी लक्षात घेऊन, टाटा 1515 एमसीव्ही बस सादर करण्यात आली आहे. ही आयोजकांसाठीची एक उत्तम व्यावासयिक भागीदार आहे. 1515 चेसिसची सिद्ध झालेली आणि विश्वासार्ह कमिन्ससारख्या कंपनीचा पाठिंबा असलेली ही बस, आयएसबीई 5.9 इंजिन, टाटा जी 600 गिअरबॉक्स आणि टाटा मार्कोपोलो बॉडी यासह येते; या वाहनात तीन पॉइंटचे सीट बेल्ट, डिस्प्लेसह रिव्हर्स कॅमेरा, यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट आणि वाय-फायसह जीपीएस अशी वैशिष्ट्ये आहेत.

टाटा मोटर्सने आजच्या घडीला विस्तारीत बस श्रेणी सादर केली आहे. आपल्या दैनंदिन वाहतुकीच्या गरजा पूर्ण करणारी श्रेणी शहरांतर्गत लक्झरी प्रवासाचे पर्याय, सुरक्षित प्रवास आणि चालकप्रधान निवडींचे पर्याय देते. टाटा मोटर्स नेहमीच तांत्रिक नावीन्यपूर्णतेत अग्रेसर राहिली आहे आणि इंधन सक्षम, प्रदूषण कमी करणारी आणि भारतात पर्यावरण पूरक उत्पादनांचा प्रसार करणारी बसची श्रेणी कंपनीतर्फे सादर करण्यात आली आहे. याबरोबरच कंपनीने हायब्रिड, इलेक्ट्रीक, इंधन सेल, एलएनजी आणि आर्टिक्युलेटेड बससारख्या वाहतुकीच्या पर्यायांची श्रेणी विकसित केली आहे. ही श्रेणी `परिकल्पित स्मार्ट शहरां’च्या भविष्यकालीन वाहतुकीच्या गरजा पूर्ण करणारी आहे. टाटा मोटर्सने शाश्वत विकास आणि नफा यातील संतुलन साधत मास पब्लिक वाहतुकीमध्ये सक्रीय भूमिका पार पाडली आहे.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.