Pune : भारतीय जवानांना बांधल्या खिंवसरा पाटील शाळेतील मुलींनी राख्या

एमपीसी न्यूज- भारतीय जवानांना राख्या बांधून खिंवसरा पाटील शाळेतील 20 मुलींनी राखीपौर्णिमा साजरी केली. हा कार्यक्रम पुण्यातील मराठा वॉर मेमोरियल येथे झाला. या कार्यक्रमाचे आयोजन खिंवसरा पाटील विद्यामंदिर थेरगाव व लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी क्रांतिवीर चापेकर समितीचे कार्यवाह अॅड. सतीश गोरडे, डॉ. रोहिदास आल्हाट, उद्योजक सचिन यादव, मराठी साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, लायन्स क्लब भोजापूरचे अध्यक्ष सुदाम भोरे, माजी अध्यक्षा डाॅ. दीपाली कुलकर्णी, तृप्ती शर्मा, मुख्याध्यापक नटराज जगताप, शिक्षिका पुष्पा जाधव, पल्लवी लोहार, माजी विदयार्थी संकेत हलगीकर व इ.5 वी ते 7 वी च्या विद्यार्थीनीं उपस्थित होते.

शाळेतील सायली पारधे व रिया हावळे यांनी ‘आमचे व देशाचे संरक्षण करता म्हणून आम्ही येथे सुखाने राहू शकतो जीवनाचा आनंद घेवू शकतो’ अशा भावना हिंदी भाषेतून व्यक्त केल्या. शिवाजी पोळ यांनी ‘आपस मे प्रेम’ देशभक्तीपर गीत गायले. सीमा आखाडे यांनी जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिंगबंर ढोकले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.