Pune : आयएमईडीच्या व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थिनींकडून वाहतूक पोलिसांना राखी

एमपीसी न्यूज- ‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या विद्यार्थिनींनी वाहतूक पोलिसांना राखी बांधून अनोख्या पद्धतीची ‘राखी पौर्णिमा’ साजरी केली.

रक्षाबंधनाच्या दिवशी रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल्सवर जे वाहतूक पोलीस कार्यरत होते त्यांना या विद्यार्थींनीनी राखी बांधली. या उपक्रमात सहभागी विद्यार्थिनींना आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, प्रा. विजय फाळके यांचे मार्गदर्शन लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.