BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अनधिकृतपणे मुद्रांक विक्रीप्रकरणी तिघांना अटक; 67 लाखांचे मुद्रांक जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील शनिवारवाडा परिसरातून 67 लाखांचा मुद्रांक घोटाळा उघडकीस आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी 67 लाख 30 हजार रुपये किमतीचे 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प लाल महालासमोरील कमला कोर्ट बिल्डिंगमधून जप्त केले आहे.  याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिन्मय सुहास देशपांडे (वय 26), सुहास मोरेश्‍वर देशपांडे (वय 59) आणि सुचेता सुहास देशपांडे (वय 54, तिघे रा. 183, कसबा पेठ, पारसनीसवाडा, पुणे), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय विश्‍वनाथ जाधव यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वरिष्ठ कोषागार अधिकारी आणि प्रथम मुद्रांक लिपिक कोषागारकरिता शिक्‍का तयार करून स्टॅम्प पेपरवर हा शिक्‍का मारून हा घोटाळा करण्यात येत होता. आरोपी देशपांडे प्रथम कोषागार कार्यालयातून स्टॅम्प काढून आणत. त्यानंतर त्यावर बनावट शिक्क्याचा वापर करून ते स्टॅम्प पेपर ब्लॅकने विकत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्‍त सुहास बावचे, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ सुनिल कलगुटकीकर आणि त्यांच्या पथकाने कमला कोर्ट बिल्डींगमधील देशपांडे यांच्या शनिवार पेठेतील पर्वती माता सोसायटीतील शॉप नंबर 1 आणि बुधवार पेठेतील देशपांडे व्हेंडरच्या दुकानावर छापा टाकला. तेथून 100 आणि 500 रूपये किंमतीची 67 लाख 30 हजार रूपयांची स्टॅम्प पेपर जप्‍त करण्यात आली आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3