Chinchwad : संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 67 जणांवर गुन्हे

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 67 जणांवर रविवारी (दि. 5) गुन्हे दाखल करण्यात आले.  कोरोना करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.  नागरिकांना संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे.  केवळ अत्यावश्‍यक आणि जीवनावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, अनेकजण काहीही कारणे सांगून आजही रस्त्यावर फिरत असल्याने करोनाचा धोका कायम आहे.  त्यामुळे पोलिसांनी   13 ते 22 मार्च दरम्यान दुकाने सुरू ठेवणा-यांवर कारवाई केली.

 

तसेच 23 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या सुमारे तेराशेहून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी 67 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

रविवारी केलेली कारवाई

-आळंदी – 03
हिंजवडी – 02
निगडी – 03
सांगवी – 21
पिंपरी – 08
भोसरी – 01
चाकण – 02
चिंचवड – 13
दिघी – 08
तळेगाव दाभाडे – 06
एकूण – 67

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.