Lonavala : महागांव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप साबळे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- महागांव ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रदीप सुनील साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच रामदास घारे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली.

सरपंच सुजाता पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी प्रदीप साबळे व शोभा सांवत याचे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र छाननी करतांना सांवत याचा अर्ज बाद झाल्याने साबळे यांची बिनविरोध निवडीची घोषणा साहाय्यक निवडणूक अधिकारी एस.एम.दुधाळ यांनी केली.

यावेळी सरपंच सुजाता पडवळ, सुरेखा जाधव, रामदास घारे, पांडुरंग मरगळे, अंजना गोरे, शोभा सांवत हे सदस्य तसेच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक एस.शेख व सुधीर घारे उपस्थित होते. प्रदीप साबळे यांच्या निवडीनंतर गणेश धानिवले, बाळासाहेब जाधव, अंकुश पडवळ, विलास साबळे, संदीप साबळे, मंगेश कालेकर, एकनाथ पडवळ, अनिल साबळे, गणेश साबळे, काशिनाथ डोंगरे, बाळु बैकर, रोहिदास साबळे, दत्ता साबळे आदी ग्रामस्थांनी गुलालची उधळण करुन पेढे वाटुन आनंदोत्सव साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.