Pune : पीएमपीएलची नफ़्याच्या दिशेने वाटचाल ?

पीएमपीएलला 204 कोटींचा तोटा ; तूट मागील वर्षीच्या तुलनेत कमी

वार्षिक उत्पन्नत 20 कोटीची वाढ

एमपीसी न्यूज – पीएमपीएल कंपनी स्थापनेपासून तोट्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) वाटचाल नफ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. कंपनीचा 2017-18 आर्थिक वर्षाचा ताळेबंद व नफा तोटा पत्रक संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आले. चालू आर्थिक वर्षासाठी पीएमपीएलला 204 कोटी 62 लाख रुपयांची तूट आली आहे. मात्र ही तूट मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे.

एका बाजूला पीएमपीएलचे वाढते ब्रेक डाऊन, अपुऱ्या बस, प्रवाशांची घटत असलेली संख्या, खिळखिळ्या झालेल्या बस यामुळे प्रवाशांचा ओढा खासगी वाहनांकडे असतानाही ही घटलेली तूट कंपनीच्या ढासळलेल्या कारभारास दिलासा देणारी आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात कंपनीला 658 कोटी 52 लाख रुपयांचे उत्पन्न मिळालेले असून, 863 कोटी 14 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे या आर्थिक वर्षाचा ताळेबंद व नफा तोटा पत्रकात नमूद करण्यात आले हे उत्पन्न 2016-17 च्या तुलनेत यंदा 20 कोटी 48 लाखाने वाढले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दोन्ही महापालिकांच्या परिवहन समित्यांचे विलीनीकरण करून डिसेंबर 2007 मध्ये पीएमपीएमएल ही स्वतंत्र कंपनी सुरू करण्यात आली. त्यात दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी, बस, त्यांच्या आस्थापना एकाच छताखाली आणण्यात आल्या. मात्र, या कंपनीस कार्यक्षम आणि पूर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्याने स्थापनेच्या दुसऱ्या वर्षापासूनच या कंपनीचा तोट्याकडे प्रवास सुरू झाला.

पहिल्या वर्षी 9 कोटी संचलन तुटीपासून हे तुटीचे ग्रहण पीएमपीला लागले. 2011-12 मध्ये ही तूट 22 कोटी 87 लाख होती, 12-13 मध्ये ६२ कोटी, 13-14 मध्ये 99 कोटी 40 लाख तर 14-15 मध्ये ही तूट तब्बल 167 कोटी 68 लाखांवर पोहोचली. त्यामुळे 2015-16 मध्ये आश्चर्याचा धक्का देत तूट 16 कोटींनी घटून 151 कोटींवर आली आहे. तर 2016-17 मध्ये तूट वाढून 210 कोटी 44 लाख पोचली.

यंदा या तुटीमध्ये घाट होत ती 204 कोटी 62 लाखावर पोचली आहे. यंदाच्या वर्षी तोटा काही कोटींनी कमी झाला असला तरी समस्यांनी ग्रासलेली पीएमपीएल दोन्ही महापालिकांच्या कुबड्या न घेता फायद्यात कधी येणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.