Pune : अखेर गणेश मंडळांना मिळाली बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी

एमपीसी न्यूज- गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी देण्यासाठी वातावरण चांगलेच तापले होते. महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील परवानगी मिळावी म्हणून मागणी केली होती. तर काँग्रेस आणि मनसेने याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र, अखेर काही अटींवर गणेश मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाबाबत आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

या बैठकीला पालकमंत्री गिरीश बापट महापालिका आयुक्त सौरव राव, पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी कमानी उभारण्यास परवानगी देताना उपस्थित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सुरक्षिततेच्या उपाययोजना मंडळांनी कराव्यात, कमानींना परवानगी असेल पण तिचा पाच फुटांचा भाग मोकळा ठेवावा असेही पालकमंत्र्यांनी मंडळांना सांगितले.

पुण्यामध्ये गणेशोत्सवादरम्यान मंडळांना बॉक्स कमानी उभारण्यास पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली होती. या निर्णर्यविरोधात मंडळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.