Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ट्रेलरला कार धडकून एक ठार दोन जखमी

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलरला कारची धडक बसून कारमधील एकजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत जवळील ताजे पिंपळोली गावाच्या हद्दीत झाली.

_MPC_DIR_MPU_II

प्राथमिक माहितीनुसार, किलोमीटर नंबर 68/400 मुंबई पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलरला (एम एच 46 ए एफ 0410) पाठीमागून भरधाव आलेल्या कारची (एम एच 14 जी एच 8239) जोरदार धडक बसली. या अपघातात कार मधील एक पुरुष ठार झाला असून वाहन चालक व मागील सीटवर बसलेली महिला गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लोकमान्य रुग्णालयात हलवण्यात आले अाहेत.
या अपघातातील मृत व जखमी यांची नावे अद्याप मिळाली नसून कामशेत पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.