Pimpri: कायम निळ्या झेंड्याखालीच राजकारण करणार – बाळासाहेब ओव्हाळ

एमपीसी न्यूज – अनुसूचित जाती जमातीमधील नागरिकांवर होणा-या अन्याय-अत्याचाराच्याविरोधात मी भूमिका मांडली होती. मी मांडलेल्या मुद्‌द्‌यांवर समाधनकारक तोडगा निघाल्याने माझी भूमिका बदलली आहे. मी भाजपच्या तिकीटावर निवडून आलो असलो, तरीदेखील खासदार रामदास आठवले यांच्यामुळेच मी राजकारणात टिकून आहे. त्यामुळे कायम निळ्या झेंड्याखालीच राजकारण करणार असल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी यु- टर्न घेतला आहे.

पिंपरीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सुधाकर वारभुवन, माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड, विनोद चांदमारे, सम्राट जकाते, गौतम गायकवाड, अजय घुमरे उपस्थित होते.

ओव्हाळ म्हणाले, ” मे महिन्यात पत्रकार परिषदे घेत, मी भाजपवर टीका केली होती. मात्र, आतापर्यंत मी मांडलेल्या मुद्‌द्‌यांवर समाधनकारक तोडगा निघाल्याने माझी भूमिका बदलली आहे. मी भाजपच्या तिकीटावर निवडून आलो असलो, तरीदेखील खासदार रामदास आठवले यांच्यामुळेच मी राजकारणात टिकून आहे. मी रिपब्लिकन पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. भविष्यातही निळ्या झेंड्याखालीच राजकारण करणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.