Nigdi: उघड्या दरवाजावाटे मध्यरात्री घरात घुसून रोकड, मोबाईल लांबविला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे घरात घुसून अज्ञात चोरट्याने घरातील दहा हजारांची रोकड असलेले पाकीट आणि मोबाईल फोन चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी (दि.7)मध्यरात्री दोनच्या सुमारास चिखलीतील ताम्हाणे वस्ती येथे घडली.

याप्रकरणी जया भीमा गायकवाड (वय 45, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गायकवाड यांच्या घराचा दरवाजा लागत नाही. शुक्रवारी रात्री त्या दरवाजा पुढे ढकलून झोपी गेल्या होत्या. मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरटा उघड्या दरवाजावाटे घरात घुसला. गायकवाड यांनी उशी जवळ ठेवलेली दहा हजारांची रोकड असलेले पाकीट आणि मोबाईल फोन चोरट्याने चोरुन नेला. निगडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.