Pune : एकाच रात्रीत चार दुकानांचे शटर उचकटून 98 हजारांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज- एकाच रात्रीत चोरटयांनी चार इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांचे शटर उचकटून 97 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. 7) मध्यरात्रीच्या सुमारास बुधवार पेठेत गंगा अर्जुन समृद्धी या इमारतीमध्ये घडली.

याप्रकरणी कपील चावला (वय 39, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी अज्ञात चोरट्याने बुधवार पेठ येथील भक्ती इलेक्ट्रॉनिक, सिटीजन इलेक्ट्रॉनिक्स, हिंद शक्ती इलेक्ट्रॉनिकस व जीवन इलेक्ट्रॉनिक या चारही दुकानांचे लोखंडी शटर मध्यरात्री उचकटून दुकानातील एकूण 97 हजार 500 रुपयांची चोरी केली. पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.