Khadakwasla Dam News : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 6,848 क्यूसेक्स विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 7,704 क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी. 5.00 वा.12,736 क्यूसेक्स करण्यात आला आहे,असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.

पावसाचा जोर खूपच वाढल्याने विसर्ग वाढवण्यात आले आहे.पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये.नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत,असेही त्यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.