Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी 

एमपीसी न्यूज- पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात आज सकाळपासून वाहतूक कोंडी झाली असून अमृतांजन पुलाजवळ  पुण्याकडे जाणा-या मार्गावर 3-4 किमी लांब पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झालेली नसल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने पुण्याकडे निघाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.