Pimpri: स्वाईन फ्ल्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी

 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात जानेवारीपासून स्वाईन फ्लूमुळे 20 नागरिक मृत्यू पावले आहेत. सद्य:स्थितीत 110 रुग्ण बाधित असून 28 जणांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्वाईन फल्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयामध्ये स्वाईन फ्ल्यूच्या टॅमी फ्लू लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे स्वाईन फ्यू आटोक्यात आणण्यात प्रशासन अपुरे पडत आहे. तसेच खासगी रुग्णालये व सरकारी रुग्णालयांच्या समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. शहरातील स्वाईन फ्ल्यूने 20 जणांचा मृत्यू झाला आहे.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक टॅमी फ्लू लस देणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या रुग्णांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबध येत असतो. त्यामुळे या कर्मचा-यांना स्वाईन फ्लू होण्याचा जास्त धोका आहे.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता शहरातील स्वाईन फ्लूची साथ आटोक्यात आणण्यासाठी टॅमी प्लू लसीचा पुरेसा साठा तयार ठेवण्यात यावा. नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.