Pimpri News : जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात 69 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – जनकल्याण फाउंडेशनच्या उद्घाटन, ॲड. रमेश शिंदे यांच्या स्मरणार्थ व कोकण भूमिपुत्र कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात 69 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 2 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडला.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक किसन भोसले होते. तसेच, दिपाली धुमाळ व कृषी अधिकारी सावंत, संस्थेचे संतोष जाधव, अमर जेधे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, विद्या ठिपसे, सुवर्णा भिकुले, सुरेश सकपाळ, हेमंत मोरे, श्रीकांत मोरे, ज्योती चव्हाण, राजेंद्र विप्र, मनीष घुले, राज नाईक, विलास धुमाळ आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

किसन भोसले यांनी आपल्या भाषणात जनकल्याण फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यात सर्वस्वी मदत करण्याचे आश्वासन दिले. सुरेश सकपाळ यांनी जनकल्याण फाऊंडेशनची ध्येयधोरणे व उद्दिष्टे सांगितले.

कार्यक्रमात जनकल्याण फाउंडेशनच्या सहकार्यातून आणि अद्वैत परिवार यांच्या माध्यमातून आलेल्या, ‘मदत नको संधी द्या’ उपक्रमाअंतर्गत अंध मुलांन कडून बनविण्यात आलेल्या वस्तु विक्रीस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. जनकल्याण फाऊंडेशन कडून या उपक्रमाला विशेष सत्कार देऊन गौरविण्यात आले.

श्री काळभैरवनाथ फाउंडेशन व कोकण भूमिपुत्र कन्या युवा सामाजिक प्रतिष्ठान यांचे रक्तदान शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.