_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी न्यायालयामघ्ये ई लायब्ररीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी न्यायालयामध्ये ई-लायब्ररी करिता निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएसनच्या वतीने खासदार अमर साबळे यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

_MPC_DIR_MPU_IV

याबाबत दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी न्यायालयामध्ये काम करणा-या वकिलांची संख्या दोन हजार पेक्षा अधिक आहे. न्यायालयीन दावे व कामकाज देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पिंपरी न्यायालयाची नवीन तात्पुरती इमारत लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे न्यायालयाकरिता मुबलक जागा उपलब्ध होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

सध्या पिंपरी न्यायालयामध्ये वकिलांसाठी असलेली लायब्ररी अपुरी असून जुन्या पध्दतीचे आहे. न्यायालयातील कामकाज वाढत चालले आहे. त्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या कामासाठी वकिलांना पुस्तकांची गरज भासते. न्यायालयीन कामकाज पाहता वकिलांना ई-लायब्ररीची आवश्यकता आहे. त्यासाठी पिंपरी न्यायालयात ई लायब्ररी उपलब्ध करून देण्यासाठी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश पुणेकर, उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे, अॅड. अतिश लांडगे, अॅड. तुकाराम पडवळे, अॅड. हर्षद नढे आदी उपस्थित होते.

यावेळी पिंपरी न्यायालयाच्या कामाचा व्याप पाहता खासदार अमर साबळे यांनी ई लायब्ररीची आवश्यकता असल्याचे सांगून पाच लाख रुपयांचा निधी मंजुर करणार असल्याचे तसेच त्याबाबतचे निर्देश लवकरात लवकर देणार असल्याचे सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.