BNR-HDR-TOP-Mobile

Kamshet : किल्ले तिकोणावर प्रथमच साजरा होतोय गणेशोत्सव

100
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- गडकिल्ल्यांवर एक चैतन्याचे वातावरण तयार व्हावे. लोकांमध्ये गडकोटांबद्दल योग्य तो आदर सन्मान निर्माण व्हावा, गडकिल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे या करिता एक प्रयत्न म्हणून किल्ले तिकोणागडावर यंदापासुन गणेशोत्सवाची सुरवात करण्यात आली आहे. काल गुरुवारी गडावर गणेशाचे पारंपरिक पद्धतीने आगमन झाले.

या उत्सवाकरिता कामशेत येथील चंद्रकांत लोळे यांचेकडुन पर्यावरण पूरक शाडुची गणेश मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर मावळ परिसरातील शिवभक्त गडपायथ्याशी जमा झाले. गणेशाच्या स्वगताकरिता मावळे, अब्दागिरी, भगवा झेंडा तयार होते. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये भक्तीमय वातावरणात श्री गणेशाचे गडाकडे प्रस्थान झाले.

गणेशजी, देवडी गुहा, वेताळाचा माळ, चपेटदान मारूतीराय मार्गाने गडमध्यावरील तळजाई माता लेणी जवळ गणपती बाप्पा पोहचले. त्यांच्या स्वागताकरिता मांडव घालून रांगोळी रेखाटण्यात आली होती. आकर्षक आरास करून मधुर आवाजात गणेशाची गाणी वाजविण्यात आली होती. त्यानंतर गणेशमूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना गडावर श्री गणेश विराजमान झालेले आश्चर्य वाटले.

त्यानंतर गडमाथ्यावरील वितंडेश्वराच्या मंदिरात पूजा करण्यात आली. श्री गणेश मूर्तीजवळ काही मावळे मुक्कामी थांबले बाकी गडउतार झाले. किल्ले तिकोणागडावर गणेशोत्सवानिमित्त रविवारी (दि.16) डॉ. प्रमोद बो-हाडे यांचे *’किल्ले तिकोणागड समग्र इतिहास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दुपारी 3 वाजता ह.भ.प.अशोक महाराज आडकर यांचे कीर्तन रूपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मनोहर सुतार, संतोष गोलांडे, गुरूदास मोहळ, माऊली मोहळ, अक्षय औताडे, किरण चिमटे, डॉ. सुधीर ढोरे, सागर वाळुंज, प्रफुल्ल बावीस्कर व शिवभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तिकोणा पेठ ग्रामस्थ व मावळ परिसरातील शिवभक्तांनी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.