Pune : पाच देशांच्या युद्ध सरावात चित्तथरारक प्रात्यक्षिके (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज- परदेशातील सैन्यांसोबत सौहार्दपूर्ण वातावरण राहावे तसेच उपनगरी भागातील दहशतवादाला आळा घालण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून भारतीय लष्करातील सदर्न कमांड सोबत भारत, बांग्लादेश, भूतान, श्रीलंका आणि म्यानमार या देशाच्या सैन्यदलांनी लष्करी सराव सुरु केला आहे. 10 ते 16 सप्टेंबरदरम्यान पुण्याजवळील औंधमध्ये हा लष्करी चालू आहे.

बे आॅफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅँण्ड इकॉनॉमिक को-आॅपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स 18 या पहिल्या लष्करी युध्द सराव घेण्यात येत आहे. या लष्करी सरावात भारत, भूतान, बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकडयांचा सहभाग आहे. बिम्सटेकमधील देशांना दहशतवाद्यांशी लढण्याच्या एकमेकांच्या पद्धती, एकमेकांच्या लष्कराची कार्यपद्धती समजावी आणि त्यांच्यातील परस्पर सहकार्य वाढावे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे. निमशहरी भागातील दहशतवाद्यांचा बिमोड ही सरावाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

या युद्धसरावादरम्यान उद्या (दि.15) पाचही देशांच्या लष्कर प्रमुखांच्या एकत्रित परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत या परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत या युद्ध सरावाचा समारोप होणार आहे. सहभागी देशांचे प्रत्येकी पाच लष्करी अधिकारी आणि पंचवीस ज्युनिअर कमिशन अधिकारी या युद्ध सरावामध्ये सहभागी झाले आहेत. भारताचे माजी राजदूत जी. पार्थसारथी संयुक्त युद्ध सरावाचे निरीक्षक म्हणून काम करीत असून अशा पध्दतीचा लष्करी सराव बांग्लादेश, भूतान, म्यानमार येथे झाला होता.

  

  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.