Pune: आयपीएचतर्फे बुधवारी नैराश्य व चिंता स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे बुधवारी (दि. 19 ) नैराश्य व चिंता स्वमदत गट आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आयपीएचतर्फे देण्यात आली आहे. या स्वमदत गटामध्ये ‘डिप्रेशन वर मात’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आय. पी. एच. तर्फे कर्वेनगर येथील इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ येथे नैराश्य व चिंता स्वमदत गट आयोजित करण्यात येतो. इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

हा स्वमदत गट पूर्णपणे विनामूल्य असून जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.