Pimple Gurav: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येत्या गुरुवारी (दि.20)विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात गुरुवारी होणा-या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप असणार असून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार सुजितसिंह ठाकूर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा, पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, पीएमआरडीचे किरण गित्ते, शहराचे महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड, माजी उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा भूषण जीवन गौरव पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल डॉ. भाऊसाहेब जाधव, प्रशासकीय – मधुकर तेलंग, सामाजिक – भूषण कदम, वैद्यकीय – डॉ. रमाकांत जोशी, वृक्षसंवर्धन अण्णा जोगदंड यांना मराठवाडा भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच कृष्णाई उळेकर यांचा मराठवाड्याची लोककला हा सांस्कृतीक कार्यक्रम सादर होणार आहे.

मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समितीचे अध्यक्ष अरूण पवार,‍ स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, माधव मनोरे, मारुती बानेवार यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.