-MPC-TOP-MOST-BANNER-I

India Corona Update : देशात 7.60 लाख सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 96.16 टक्के 

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भारतातील रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 60 हजार 753 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 97 हजार 743 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 7.60 लाख सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 96.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 98 लाख 23 हजार 546 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 86 लाख 78 हजार 390 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 7 लाख 60 हजार 019 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 85 हजार 137 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 1 हजार 647 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.28 टक्के एवढा झाला आहे. देशात आजवर 38 कोटी 92 लाख 07 हजार 637 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 19 लाख 02 हजार 009 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 27 कोटी 23 लाख 88 हजार 783 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.
.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn