Pune : जात प्रमाणपत्र सादर न केल्याने सात नगरसेवकांचे पद रद्द

भाजपचे 5 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक; नगरविकास खात्याला पाठविला अहवाल

एमपीसी न्यूज – विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने पुण्याच्या सात नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. त्यामध्ये 5 भाजपचे तर 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भातील अहवाल नगरविकास खात्याला पाठविला आहे. यामध्ये भाजपाचे किरण जठार, आरती कोंढरे, फर्जाना शेख, कविता वैरागे, वर्षा साठे अशा पाच नगरसेवकांचा तर राष्ट्रवादीच्या बाळा धनकवडे, रूखसाना इनामदार या दोन नगरसेवकांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.