या निवडणुकीत 70 टक्के मतदानाचे ध्येय – दिनेश वाघमारे

मंगळवारी 1608 मदतान केंद्रांवर 11 लाख उमेदवार करणार मतदान

मतदारांच्या सहाय्याला 511 लॅपटॉप पथके

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत 52 टक्के मतदान झाले होते. मात्र, ही टक्केवारी वाढवून 70 टक्क्यांवर नेण्याचे आमचे ध्येय असल्याचे महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारपरिषदेत सांगितले.

यावेळी आयुक्त म्हणाले की, गेल्यावेळी मतदानामध्ये महिला, उच्च शिक्षितवर्ग तसेच अल्पसंख्यांकवर्ग मागे असल्याचे चित्र आहे. मात्र, यावेळी आम्ही जनजागृतीवर भर दिला असून मतदानाचा टक्का 70 टक्क्यांवर नेण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी मतदारांनी माझ्या एका मताने काय होणार, असा विचार न करता प्रत्येकाने आपले अमुल्य मत द्यावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. 

महापालिका निवडणूक अवघ्या चार दिवसावर आली असून त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासान व पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. मंगळवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी 1 हजार 608 मतदान केंद्रावर 11 लाख 92 हजार 89 मतदार मतदान करणार आहेत. 

# 159 मतदान केंद्रे मनपा शाळेत, 324 मतदान केंद्रे, 1 शासकीय इमारतीमध्ये  तर 2 एमआयडीसी इमारतीमध्ये असणार आहेत. 

# मतदार यादी वाटपासाठी एकूण 812 कर्मचारी नियुक्त केले असून, उद्या संध्याकाळपर्यंत यादी वाटपाचे काम संपणार.

# मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधता यावे यासाठी ट्रू व्होटर अॅप राज्य निवडणूक आयोगाने विकसित केले आहे. शिवया  11 निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, 6 प्रभाग कार्यालये, मतदान केंद्राच्या 486 इमारती व इतर 8 इमारतीमध्ये अशा एकूण 511 लॅपटॉप पथके तयार करण्यात आली आहेत जी  मतदारांना मदत करतील.

# मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा, अॅम्बूलन्सची सोय शिवाय वृद्ध व अपंगांसाठी व्हील चेअर, डोली आदीची सोय.

# तसेच मदरारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी 258 पीएमपीएमएल बसेस, 45 मिनी बसेस, 35 मोटार कार अशा 368 वाहनांची सोय.

# मतदान केंद्रावर 10 हजार 710 कर्मचा-यांची नेमणूक.

# 19 तारखेच्या सायंकाळी पाचपासून प्रचार थांबवणार तसेच  राजकीय पक्षांचे झेंडे, बॅनरही काढणार.

#  20, 21 व 23 फेब्रुवारी रोजी दारू विक्रीवर बंदी.  

# आचारसंहिता कक्षामार्फत 7 लाख 46 हजार 137 रुपयांचा मुद्देमाल जप्त, तर झेंडे, बॅनर्स आदी अशा 21 हजार 370 राजकीय प्रचार साहित्यावर कारवाई.

# शहर परिसरातच अचारसंहिता कक्षाचे 74 पथके कार्यान्वयीत. तर नागरिकांनाही कॉप या मोबाईल अॅद्वारे व 1447751372 या व्हॉट्स अॅप क्रमांकावरही देता येणार तक्रार.

# उमेदवार किंवा पक्ष ज्यांनी वेळेत खर्चाचा तपशील दिला नाही अशा 160 उमेदवारांना निवडणूक विभागाच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. 

# राजकीय पक्षांनी निवडणूक संपल्यानंतर 60 दिवसात हिशोब सादर करावा. 

# मतदारांसाठी उबेर टॅक्सीचीही सवलत. मतदारांसाठी 5 किमीला 50 रुपये कंपनीतर्फे ऑफ. 

यावेळी मतदारांनी  प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मतदानाचा दिवस केवळ सुट्टीचा दिवस म्हणून न घालवता आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन  महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.