India Corona Update : चोवीस तासांत 70 हजार नवे रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण दहा लाखाच्या खाली  

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना संसर्गाचा वेग उतरणीला लागला आहे. मागील एक आठवड्यापासून देशात एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 70 हजार 421 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच, देशातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली आली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 81 लाख 62 हजार 947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 19 हजार 501 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या दहा लाखाच्या खाली आली असून, सध्याच्या घडीला देशात 9 लाख 73 हजार 158 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 74 हजार 305 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 921 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.26 टक्के एवढा झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 95.43 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

देशात आजवर 37 कोटी 96 लाख 24 हजार 626 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 14 लाख 92 हजार 152 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 25 कोटी 48 लाख 49 हजार 301 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.