Talegaon Dabhade : कलापिनीतर्फे 29 व 30 सप्टेंबर रोजी कै. पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत स्पर्धा

एमपीसी न्यूज- दरवर्षीप्रमाणे कलापिनीतर्फे तळेगाव दाभाडे येथे 29 व 30 सप्टेंबर रोजी कै. पद्माकर प्रधान स्मृती मराठी सुगम संगीत संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे 42 वे वर्ष आहे.

या स्पर्धेमध्ये 1 ली ते 10 वी शालेय गट, प्रौढ गट (वय 31 ते 60 वर्षे) व ज्येष्ठ गट (वय 60 व पुढे) हे मावळ तालुक्यासाठी तर युवक गट (वय 16 ते 30 वर्षे) यामध्ये मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड विभागातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात.

29 व 30 सप्टेंबर रोजी प्राथमिक फेरी व रविवार 7 ऑक्टोबरला अंतिम फेरी वाद्यवृंदासह संपन्न होणार व अंतिम स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. तरी सर्व मावळ व पिंपरी-चिंचवड परिसरातील गुणी गायकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकशी व नाव नोंदणीसाठी अशोक बकरे यांच्याशी 9423506400 या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.