Chinchwad : पराग पाटील यांना एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये कांस्य पदक

एमपीसी न्यूज – एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये चिंचवडमधील पराग पाटील यांनी किक बॉक्सिंग प्रकारात कांस्य पदक मिळवून चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरले आहे.

एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स या स्पर्धा मलेशिया येथे 7 ते 15 सप्टेंबर या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेसाठी चिंचवडच्या पराग पाटील यांनी ट्रिपल जंम्पमध्ये कांस्य पदक मिळविले.

या अगोदर त्यांनी 2010 मध्ये फस्ट इंटरनॅशनल वेटरन अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप पुणे मध्ये 3 रौप्य, 2013 मध्ये वर्ल्ड मास्टर गेम्स टीरिनो इटली येथे 1 रौप्य, 2 कांस्य, 2015 मध्ये ऑस्ट्रेलियन मास्टर गेम्स अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) येथे 2 सुवर्ण, 2 रौप्य तर 2017 मध्ये वर्ल्ड मास्टर गेम्स ऑकलंड (न्यूझिलंड) येथे 1 रौप्य अशी एकूण 2 सुवर्ण तर 7 रौप्य, 3 ब्रॉंझ अशी पदके मिळवून आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहे. तीन वर्षापासून त्यांना गुडघ्याचा त्रास होत असूनही हे यश मिळविले आहे. तीन वर्षापासून त्यांना गुडघ्याचा त्रास होत असूनही हे यश मिळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.