Pimpri : पिंपरी -चिंचवड शहरातील गणेश विर्सजन मिरवणुकीचे लाइव्ह अपडेट्स (व्हिडिओ)

# चिंचवडमध्ये दुपारी दोन वाजता सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजता संपली. मिरवणुकीत एकूण ३६ मंडळांचा सहभाग

# पिंपरी विसर्जन मिरवणुकीत एकूण 61 गणेश मंडळांचा सहभाग 

# दुपारी बारा वाजता सुरु झालेली पिंपरी मधील गणेश विसर्जन मिरवणूक साडेअकरा तासानंतर समाप्त. सिद्धिविनायक गणेश मंडळ हे शेवटचे गणेश मंडळ

# रात्री बारा वाजेपर्यंत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या वेळी उपस्थित असणे गरजेचे असताना पावणेबारा वाजण्यापूर्वीच पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या स्वागत मांडवातून पिंपरी चिंचवड पालिकेचे अधिकारी गायब

# गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी महापालिकेने उभारला नाही स्वागत कक्ष

# चापेकर चौकात महापौर राहुल जाधव विसर्जन मिरवणुक कॅमेऱ्यात टिपताना

# शिवराजे प्रतिष्ठान मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज सोबत मावळे आणि इंग्रज सुद्धा

# पिंपरी येथील श्री लालबहादूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत रंगतदार सनईवादन

# श्री दत्त मित्र मंडळ मानाचा गणपती , शिव मल्हार ढोल ताशा पथक सहभागी. आकर्षक फुलांची सजावट

# पिंपरीतील विसर्जन मिरवणुकीत फुलांची मुक्त उधळण, पारंपरिक वाद्य ढोल-ताशाला पसंती, तरुण-तरुणींचा उत्साही जल्लोष;

# निर्माल्य दान, अन्नदान, पोलिसमित्र आदी कामांसाठी स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग

# श्री दत्त मित्र मंडळ मानाचा गणपती चापेकर चौकात दाखल

# चिंचवड येथे भगतसिंग मित्र मंडळ , महिलांनी खाद्यावर घेतलेल्या पालखीत बाप्पा विराजमान

# श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ चिंचवडचा राजा, शिवरथ, मिरवणुकीत अग्नीतांडव ढोल पथक सहभागी. मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना

# काळभैवरनाथ मित्र मंडळ, चिंचवडगाव – महागाईचा भस्मासुर, गॅस, पेट्रोल शतकाच्या उंबरठ्यावर असा मजकूर लिहिला आहे. ज्ञानप्रबोधिनी ढोल ताशा पथक. साहेब तुम्ही सांगा दंड किती भरायचा…चौघांच्या बाईकमध्ये पेट्रोल भरण्यापेक्ष दंड परवडेल.

# उत्कृष्ट तरुण मित्र मंडळ. आकर्षक ‘गजरथ’ साकारला. स्वामी समर्थांची 25 फुटी भव्य मुर्ती. त्यावर फुलांची उधळण करत मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना

# मिरवणुकीच्या बंदोबस्तानंतर मोकळे झालेल्या पोलिसांनी सेल्फी काढून आलेला तणाव दूर केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.