Talegaon Dabhade : हिंजवडी बलात्कार घटनेच्या निषेधार्थ जायंट्स ग्रुपचा मूक मोर्चा

एमपीसीए न्यूज- हिंजवडी जवळ कासारसाई येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या दोन अल्पवयीन मुलींवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे आणि सजग नागरिक यांच्या वतीने रविवारी निषेध मूक मोर्चा काढण्यात आला.

तळेगाव स्टेशन येथील मराठा क्रांती चौक शिल्पास सकाळी 10 वाजता पुष्पहार घालून निषेध मोर्चास सुरुवात आली. आरोपींवरील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन यावेळी पोलीस यंत्रणेला देण्यात आले.

मराठा क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – उद्योग धाम मार्गे होऊन पुन्हा मराठा क्रांती चौक येथे श्रद्धांजली वाहून या मोर्चाचा समारोप झाला. जायंट्स ग्रुपचे उपाध्यक्ष हिरामण बोत्रे, सदस्य आण्णाराव कोळी, माऊली लोखंडे, गुलाब पारखी, सुरज कुर्डे, शैलेश सिंग, बाळासाहेब जामदार, जयश्री टिळे, राजश्री गोंदेगावे, सुप्रिया कुर्डे ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिंदे, शिवाजी कारंडे, चंदन कारके यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष ॲड देविदास टिळे, संस्थापक अध्यक्ष संदीप गोंदेगावे, संचालिका कल्याणीताई लोखंडे, माजी नगराध्यक्षा तथा ज्येष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे, नगरसेवक रोहित लांघे ,माजी नगरसेवक सचिन टकले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस आदींनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.