Pimpri Corona Update: शहरात आज 71 नवीन रुग्णांची नोंद; 119 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 71 नवीन कोरोना (Pimpri Corona Update) बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 625 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 64 हजार 249 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 437 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 391 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pune Traffic: मुसळधार पावसामुळे पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

 

तर, 46 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 2 हजार 195 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 73 हजार 693 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.