Pune : डुकरांच्या प्रश्नावरून महापालिका सभागृहात विरोधकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज- पुणे शहर आणि परिसरात वाढलेल्या मोकाट डुकरांचा प्रश्न चांगलाच गाजला. शहर उपनगरातील वाढत्या डुकरांच्या उपद्रवा विरोधात मनसे राष्ट्रवादीने प्रतिकात्मक डुक्कर आणून महापालिका सभागृहात अनोखे आंदोलन केले. तर अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्या नावाचे टी शर्ट घालून नगरसेवकांनी आंदोलन केले.

’70 लाख खर्च करून अवघे 1 डुक्कर पकडले’ असा प्रहार करत नगरसेवक भैय्या जाधव यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तर शिवसेनेचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी डुकरांचे शहर अशी ख्याती पुण्याची होऊ देऊ नका अशी भूमिका सभागृहात मांडली.

‘प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून डुक्करांचा बंदोबस्त करण्याची मागणी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली. सत्ताधारी भाजपप्रमाणे अधिकाऱ्यांना देखील पुणेकरांना गाजर दाखवण्याची सवय लागली आहे. असा टोला वसंत मोरे यांनी लगावला. मोकाट डुकरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.